मंदिरात आलो तुझ्या दर्शनाला
मंदिरात आलो तुझ्या दर्शनाला
महाद्वारी नाचे भक्तवृंद मेळा
पंढरीचा राया, सखा नारायण
वेड लावी मना विठ्ठल सावळा
माझा पाठीराखा हरी गिरिधारी
भक्तांचा कैवारी गोकुळी गुंगला
निशिदिनी घ्यावे मुखी रामनाम
रामनामी जीव भजनी रंगला
महाद्वारी नाचे भक्तवृंद मेळा
पंढरीचा राया, सखा नारायण
वेड लावी मना विठ्ठल सावळा
माझा पाठीराखा हरी गिरिधारी
भक्तांचा कैवारी गोकुळी गुंगला
निशिदिनी घ्यावे मुखी रामनाम
रामनामी जीव भजनी रंगला
गीत | - | योगेश्वर अभ्यंकर |
संगीत | - | विठ्ठल शिंदे |
स्वर | - | गजानन वाटवे |
गीत प्रकार | - | विठ्ठल विठ्ठल, भक्तीगीत |
निशिदिनी | - | अहोरात्र. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.