A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मंद मंद ये समीर

मंद मंद ये समीर
जागवीत आठवणी
विकसित मधुगंध बहर
स्वर्गसुखाच्या लहरी

झळझळती कळस दूर
येता परिसर जवळी
बघ रे बघ विरहार्ता
आली तव अवधपुरी

प्रिय बांधव स्वजन तात
भेटता दिठी दिठी
मातृदेवता मदीय
बघतिल डोळे भरुनी
सज्ज उभी स्वागतास
माझी अयोध्या नगरी