मनासारखे झाले माझ्या
जादुगिरी ही कोणी केली, कळुनी नाही आले
मनासारखे झाले माझ्या मनासारखे झाले !
मज कळले नाही काही, मी कधी पाहिले त्यांना
मज कळले नाही बाई, मी काय बोलले त्यांना
हसले माझे ओठ म्हणू की हसले माझे डोळे?
ते सद्गुण की ते रूप, मज काय नेमके रुचले?
ते निसर्गजीवन दिसता मज काय नेमके सुचले
माया-ममता माझ्याभवती विणती कैसे जाळे?
हे वेड अनामिक आहे की अधीरता ही मनची
उघड्याच लोचनी दिसती स्वप्ने ही जागेपणची
मला न कळता माझ्या हाती साज असा हा ल्याले !
मनासारखे झाले माझ्या मनासारखे झाले !
मज कळले नाही काही, मी कधी पाहिले त्यांना
मज कळले नाही बाई, मी काय बोलले त्यांना
हसले माझे ओठ म्हणू की हसले माझे डोळे?
ते सद्गुण की ते रूप, मज काय नेमके रुचले?
ते निसर्गजीवन दिसता मज काय नेमके सुचले
माया-ममता माझ्याभवती विणती कैसे जाळे?
हे वेड अनामिक आहे की अधीरता ही मनची
उघड्याच लोचनी दिसती स्वप्ने ही जागेपणची
मला न कळता माझ्या हाती साज असा हा ल्याले !
गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | घरची राणी |
गीत प्रकार | - | मना तुझे मनोगत, चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.