मन मिळे जिथे दोघांचे
मन मिळे जिथे दोघांचे
त्या घरी रोज चैत्राचे, चांदणे गोड प्रेमाचे
कनकाच्या बांधुनी भिंती, राहता चतुर्भुज प्रीती
हर्षाने उधळित मोती, नक्षत्र आलं बाई स्वाती
कर जुळे पृथ्वी चंद्राचे, चांदणे गोड प्रेमाचे
दोन जिवांची पुष्पे फुलली, चिरकाली चंद्रमहाली
आनंदे नाचत आली, स्वर्गीची लक्ष्मी खाली
सुख झुले घरी इंद्राचे, चांदणे गोड प्रेमाचे

गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | वादळ |
गीत प्रकार | - | चित्रगीत, मना तुझे मनोगत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.