A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मन का बोलाविते

मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना
जे परतून कधी ना आले

श्रावणधारा, वादळवारा, झेलिल्या मी उन्हाच्या झळा
झिरपत झिरपत उन्हाळ्यामागून आला पावसाळा
मन माझे कुणा ना दिसले

पाखरे जर दिवस असते, आभाळी मी सोडिले नसते
धरुनी त्यांना हृदयांत मी कोंडुनी ठेविले असते
ते पाखरू मागे न वळले