मल्हारवारी मोतियानं (२)
मल्हारवारी मोतियानं द्यावी भरून
नाही तर देवा, देवा मी जातो दुरून
गड जेजुरीचे आम्ही रहिवासी
देवाचा झेंडा वळखला दुरुन
मोतियानं द्यावी भरून
नाही तर देवा, देवा मी जातो दुरून
बानू म्हाळसा रमाबाई शिंपिण
देवाचा चालली हात धरून
सूरदासाचा निश्चय त्याचा
चरणांवर जावे मरून
नाही तर देवा, देवा मी जातो दुरून
रुसला का मजवरी मल्हारी, रुसला का मजवरी जी
बानू नार आणली घरी मल्हारी रुसला का मजवरी जी
रुसला का मजवरी मल्हारी, रुसला का मजवरी जी
लखलख दिवट्या जळती, पाजळली दीपमाळ
पाजळली दीपमाळ
रुसला का मजवरी मल्हारी, रुसला का मजवरी जी
कडेकपारी त्रिशूलद्वारी, वर उधळे भंडार
वर उधळे भंडार
नाथ निरंजन सद्गुरू स्वामी घेतलासे अवतार
घेतलासे अवतार देवा लोटलासे भंडार
रुसला का मजवरी मल्हारी, रुसला का मजवरी जी
मल्हारधनी मी म्हाळसा राणी
कर जोडुनी लागतो चरणी
प्रीत नको तुजवरी, प्रीत नको तुजवरी

गीत | - | पारंपरिक |
संगीत | - | शाहीर साबळे |
स्वर | - | |
गीत प्रकार | - | लोकगीत, या देवी सर्वभूतेषु |
टीप - • या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल. |
कपार | - | खबदड. |
वारी | - | देवाच्या नावाने मागितलेली भिक्षा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.