A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मजवरी तयांचें प्रेम

मजवरी तयांचें प्रेम खरें ।
जें पहिलें जडलें तें उरे ॥

कसासि लावुनि अंत पाहिला ।
परि न जराही ओसरे ॥

संशय-पटला दूर सारितां ।
प्रकाशेल कीं मग पुरें ॥