A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माझें माहेर पंढरी

माझें माहेर पंढरी ।
आहे भीवरेच्या तीरीं ॥१॥

बाप आणि आई ।
माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥

पुंडलिक आहे बंधू ।
त्याची ख्याती काय सांगूं [१] ॥३॥

माझी बहीण चंद्रभागा ।
करीतसे पाप भंगा ॥४॥

एका जनार्दनीं शरण ।
करी माहेरची आठवण ॥५॥
गीत - संत एकनाथ
संगीत - राम फाटक
स्वराविष्कार- पं. भीमसेन जोशी
किशोरी आमोणकर
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - भूप, नट
गीत प्रकार - संतवाणी, विठ्ठल विठ्ठल
  
टीप -
• स्वर- पं. भीमसेन जोशी, संगीत- राम फाटक.
• स्वर- किशोरी आमोणकर, संगीत- किशोरी आमोणकर.
भीवरेच्या - भीमा नदीच्या.
पृथक्‌
[१] - मूळ अभंगात- पुंडलिक बंधू आहे । त्याची ख्याती सांगूं काय ॥

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  पं. भीमसेन जोशी
  किशोरी आमोणकर