माझं ठरल्यालं लगीन मोडलं
कुणासाठी सखे तू घरदार सोडलं ग
माझं ठरल्यालं लगीन मोडलं ग
बाळपणापासून तुमचा-आमचा मैतरपणा
संगतीनं सूर-पारंबी खेळलो, केला लई हूडपना
वय वाढता, वाढता, वाढता, पटल्या पिरतीच्या खुणा
अन् आज कसं येड्यावाणी जाणंयेणं सोडलं ग
आंबेराईतल्या शंभूमहादेवाच्या देवळात
तुमचे-आमचे काय काय बोलणे झाले होतं
दिला बोल, इसरला हातोहात, हातोहात
अन् आज कसं भलत्याशी नातं तुम्ही जोडलं
तुम्ही पाच पंच न्याय करा, चावडी म्होरं
इश्वासघाताची फिर्याद करतो मी सादर
हिनं माजं पार डुबिवलं घरदार, घरदार
हिनं चालत्या गाडीचं चाक की हो काढलं
माझं ठरल्यालं लगीन मोडलं ग
बाळपणापासून तुमचा-आमचा मैतरपणा
संगतीनं सूर-पारंबी खेळलो, केला लई हूडपना
वय वाढता, वाढता, वाढता, पटल्या पिरतीच्या खुणा
अन् आज कसं येड्यावाणी जाणंयेणं सोडलं ग
आंबेराईतल्या शंभूमहादेवाच्या देवळात
तुमचे-आमचे काय काय बोलणे झाले होतं
दिला बोल, इसरला हातोहात, हातोहात
अन् आज कसं भलत्याशी नातं तुम्ही जोडलं
तुम्ही पाच पंच न्याय करा, चावडी म्होरं
इश्वासघाताची फिर्याद करतो मी सादर
हिनं माजं पार डुबिवलं घरदार, घरदार
हिनं चालत्या गाडीचं चाक की हो काढलं
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | पु. ल. देशपांडे |
स्वर | - | पं. वसंतराव देशपांडे |
चित्रपट | - | मानाचं पान |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.