मज पाहताच सखये
मज पाहताच सखये हसतेस तू जराशी
उजळून चांदण्यांच्या येती क्षणांत राशी
सांगायचे तुला की मज व्हायचे तुझा ग
मानू नकोस परके तुझियाच काळजा ग
सलगी करीत नाही का गंध अत्तराशी
तुझियाविनाच छळतो हा घाव स्पंदनाचा
जळतो उरात रात्री वैशाख अन् उन्हाचा
हा खेळ वेदनांचा बेचैन अंतराशी
उजळेल रोज माझी नयनी तुझ्या उषा ग
झळकेल रोज माझी नयनी तुझ्या दिशा ग
छाया तुझी मिळाया मी ऊन ऊन प्राशी
उजळून चांदण्यांच्या येती क्षणांत राशी
सांगायचे तुला की मज व्हायचे तुझा ग
मानू नकोस परके तुझियाच काळजा ग
सलगी करीत नाही का गंध अत्तराशी
तुझियाविनाच छळतो हा घाव स्पंदनाचा
जळतो उरात रात्री वैशाख अन् उन्हाचा
हा खेळ वेदनांचा बेचैन अंतराशी
उजळेल रोज माझी नयनी तुझ्या उषा ग
झळकेल रोज माझी नयनी तुझ्या दिशा ग
छाया तुझी मिळाया मी ऊन ऊन प्राशी
गीत | - | अनिल साबळे |
संगीत | - | सोमेश नार्वेकर |
स्वर | - | मंदार आपटे |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.