मैत्रिणिंनो सांगू नका
मैत्रिणिंनो, सांगु नका नांव घ्यायला
नका विचारुं स्वारि कशी? दिसे कशी अन् हांसे कशी?
कसं पाडलं मला फशी? कशी जाहलें राजिखुशी?
नजीक येतां मुहूर्तवेळां,
मैत्रिणिंनो, सांगु नका नांव घ्यायला
नका विचारूं गमतिजमती, काय बोललो पहिल्या भेटी?
कसे रंगले स्वप्न पहाटी? कशी रंगली लाली ओठी?
कसा जाहला जीव खुळा?
मैत्रिणिंनो, सांगु नका नांव घ्यायला
अर्थ उलगडे समरसतेचा, सुटे उखाणा संसाराचा
छंद लागला मजला त्यांचा, धुंद बने बुल्बूल जिवाचा
घरी यायची झाली वेळां,

गीत | - | मनमोहन नातू |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वराविष्कार | - | ∙ रंजना जोगळेकर ∙ सरोज वेलिंगकर ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.