राहिलो भिकारी !
लागली न वरणी माझी
कोणत्याच दारी !
भाग्यवान लाचारांना
दिसे मीच नंगा
घेउनी न झोळी आलो
म्हणुन मी लफंगा !
तशी जरी दातारांची
मानतो भलाई
फाटक्या खिशाला माझ्या
बोचते कमाई !
आसवांत माझी अर्धी
भाकरी बुडाली;
सोसण्यात उरलीसुरली
भूक शांत झाली !
गीत | - | सुरेश भट |
संगीत | - | सी. रामचंद्र |
स्वर | - | सी. रामचंद्र |
गीत प्रकार | - | भावगीत |
वरणी | - | क्रमाक्रमाने येणारी देवाची विधिवत पूजा करण्याची पाळी. |
मागता मागता न आले म्हणुनी राहिलो भिकारी !
म्हणतात, त्यावेळी त्या न मागण्याच्या वृत्तीमुळे लाभलेली श्रीमंती त्यांना गवसली आहे, हे उमजते.
लाचारांचा आचारधर्म पाळला नाही म्हणून त्यांना दु:ख नाही, तर अपार आनंद आहे. सुरेश भटांशी ज्यांचा चांगला परिचय आहे त्यांना त्यांच्या फाटक्या खिशाचा हेवा वाटावा अशी वस्तुस्थिती आहे. कवीचे काव्य आणि त्याचे खाजगी जीवन यांची सांगड घालायचा कुणी आग्रह धरू नये. माणूस चोवीस तास एकच भाववृत्ती घेऊन जगत नसतो. काव्यातल्या कलंदरीचा, सौंदर्याचा, चांगल्या आनंदचा ध्यास प्रत्यक्ष जीवनात घेऊन जगणारा कवी भेटला की अधिक आनंद वाटतो एवढेच. निखळ साहित्यसमिक्षेत 'सुरेश भटांची कविता' एवढाच चर्चेचा विषय असावा. माझ्या सुदैवाने मला सुरेश भटांचा स्नेह लाभला. त्यामुळे त्यांची कविता ऐकताना किंवा वाचताना सुरेश भट नावाचा एक मस्त माणूस मला निराळा काढता येत नाही, ही एक वैयक्तिक मर्यादा असावी.
(संपादित)
पु. ल. देशपांडे
'रंग माझा वेगळा' या सुरेश भट यांच्या कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- साहित्य प्रसार केंद्र, नागपूर.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.