A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मधुरिके नाच

मधुरिके नाच, चंद्रिके नाच
गीत मधाचे गात, आज प्रीतीची रात

दिवस कालचा सरला गेला
घडायचे ते घडो उद्याला
हा आताचा क्षण मोलाचा
मन:पूत घे स्वाद तयाचा
गुंतव हातात हात, आज प्रीतीची रात

जननीतीचा धाक फुकाचा
हा तर उत्सव स्पर्शसुखाचा
गाल लाव ये अलगद गाला
प्रीत उमगू दे सर्वांगाला
वाच गुपित डोळ्यांत, आज प्रीतीची रात

नाच यौवना हलवित कंबर
दिवे नाचती, नाचे झुंबर
ताल नाचतो, सूर नाचती
मना न आता बंध काचती
लय भरली पायात, आज प्रीतीची रात