मधु इथे अन् चंद्र तिथे
मधु इथे अन् चंद्र तिथे झुरतो अंधारात
अजब ही मधुचंद्राची रात
एक चंद्र अन् अगणित तारे, दो हृदयांवर किती पहारे
हवी झोपडी मिळे कोठडी सरकारी खर्चात
अजब ही मधुचंद्राची रात
माहेराला सोडुन फसले, नशिबी आले सासर असले
ताटातुटीने सुरेख झाली संसारा सुरुवात
अजब ही मधुचंद्राची रात
किती पाहुणे किती निमंत्रित, जमले सारे एका पंक्तीत
अशी निघाली लग्नानंतर वार्यावरती वरात
अजब ही मधुचंद्राची रात
अजब ही मधुचंद्राची रात
एक चंद्र अन् अगणित तारे, दो हृदयांवर किती पहारे
हवी झोपडी मिळे कोठडी सरकारी खर्चात
अजब ही मधुचंद्राची रात
माहेराला सोडुन फसले, नशिबी आले सासर असले
ताटातुटीने सुरेख झाली संसारा सुरुवात
अजब ही मधुचंद्राची रात
किती पाहुणे किती निमंत्रित, जमले सारे एका पंक्तीत
अशी निघाली लग्नानंतर वार्यावरती वरात
अजब ही मधुचंद्राची रात
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | एन्. दत्ता |
स्वर | - | आशा भोसले, महेंद्र कपूर |
चित्रपट | - | मधुचंद्र |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.