माय यशोदा हलवी पाळणा
माय यशोदा हलवी पाळणा गोड गीत गाई
बालमुकुंदा मेघश्यामा करि गाई गाई
भरुनि येता हात जरा ती झोका थांबवुनी
उठे पाळण्यापाशी येई पाही डोकावुनी
हात पाय नाचवी श्रीहरि हासुनी वरी पाही
माय यशोदा हलवी पाळणा गोड गीत गाई
दिसमासाने कृष्ण वाढला लागे रांगाया
धरावयासी धावे माता वार्यासी वाया
पुरे पडे ना वाडा अंगण अपुरे त्या होई
माय यशोदा हलवी पाळणा गोड गीत गाई
बालमुकुंदा मेघश्यामा करि गाई गाई
भरुनि येता हात जरा ती झोका थांबवुनी
उठे पाळण्यापाशी येई पाही डोकावुनी
हात पाय नाचवी श्रीहरि हासुनी वरी पाही
माय यशोदा हलवी पाळणा गोड गीत गाई
दिसमासाने कृष्ण वाढला लागे रांगाया
धरावयासी धावे माता वार्यासी वाया
पुरे पडे ना वाडा अंगण अपुरे त्या होई
माय यशोदा हलवी पाळणा गोड गीत गाई
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | कृष्णा कल्ले, सुधीर फडके |
चित्रपट | - | संत गोरा कुंभार |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.