मायबाप सेवा पवित्र
मायबाप सेवा पवित्र हे कर्म
हेचि महा पुण्य, हाच खरा धर्म
मन त्यांचे गंगाजळ, स्पर्श चंदन शीतळ
माया मोजता मोजता थिटे पडते आभाळ
पावन चरण त्यांचे हेच चार धाम
हेचि महा पुण्य, हाच खरा धर्म
सेवा करता करता पंचप्राणही अर्पावे
मरूनही त्यांच्या पोटी पुन्हा पुन्हा जन्मा यावे
हेचि आपुल्या जन्माचे सार्थक उत्तम
हेचि महा पुण्य, हाच खरा धर्म
पिता विष्णू माता लक्ष्मी, पिता सांब माता गौरी
असा भक्तीभाव राहो सदा माझिया अंतरी
मायबाप दैवत हेचि वेद-शास्त्र-मर्म
हेचि महा पुण्य, हाच खरा धर्म
हेचि महा पुण्य, हाच खरा धर्म
मन त्यांचे गंगाजळ, स्पर्श चंदन शीतळ
माया मोजता मोजता थिटे पडते आभाळ
पावन चरण त्यांचे हेच चार धाम
हेचि महा पुण्य, हाच खरा धर्म
सेवा करता करता पंचप्राणही अर्पावे
मरूनही त्यांच्या पोटी पुन्हा पुन्हा जन्मा यावे
हेचि आपुल्या जन्माचे सार्थक उत्तम
हेचि महा पुण्य, हाच खरा धर्म
पिता विष्णू माता लक्ष्मी, पिता सांब माता गौरी
असा भक्तीभाव राहो सदा माझिया अंतरी
मायबाप दैवत हेचि वेद-शास्त्र-मर्म
हेचि महा पुण्य, हाच खरा धर्म
गीत | - | अण्णासाहेब देऊळगावकर |
संगीत | - | भास्कर चंदावरकर |
स्वर | - | रवींद्र साठे |
चित्रपट | - | भक्त पुंडलिक |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
सांब | - | शंकर / भोळा मनुष्य. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.