लक्ष्मीवल्लभा दीनानाथा
लक्ष्मीवल्लभा । दीनानाथा पद्मनाभा ॥१॥
सुख वसे तुझे पायीं । मज ठेवीं ते चि ठायीं ॥२॥
माझी अल्प हे वासना । तूं तो उदाराचा राणा ॥३॥
तुका ह्मणे भोगें । पीडा केली धांव वेगें ॥४॥
सुख वसे तुझे पायीं । मज ठेवीं ते चि ठायीं ॥२॥
माझी अल्प हे वासना । तूं तो उदाराचा राणा ॥३॥
तुका ह्मणे भोगें । पीडा केली धांव वेगें ॥४॥
गीत | - | संत तुकाराम |
संगीत | - | पं. कुमार गंधर्व |
स्वर | - | पं. कुमार गंधर्व |
गीत प्रकार | - | संतवाणी |
टीप - • 'तुकाराम- एक दर्शन' या पं. कुमार गंधर्व यांच्या कार्यक्रमातून. |
ठाय | - | स्थान, ठिकाण. |
पद्मनाभ | - | विष्णू. |
वल्लभ | - | पती / प्रिय. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.