लाविते भाळी तुझिया
लाविते भाळी तुझिया पाउलांची धूळ रे
घेई माझिया अंतरीची एकदा चाहूल रे
होऊ दे साकार स्वप्ना, पाहू दे मांगल्य ते
वाहते चरणांवरी ह्या जीवनाचे फूल रे
वंचनेची रात्र काळी संपली, आली उषा
हासली आशा प्रीतीची पांघरुनी झूल रे
पापण्यांना स्तब्ध राहू दे तुझिया चिंतनी
का पडावी सांग राया मन्मनाला भूल रे
घेई माझिया अंतरीची एकदा चाहूल रे
होऊ दे साकार स्वप्ना, पाहू दे मांगल्य ते
वाहते चरणांवरी ह्या जीवनाचे फूल रे
वंचनेची रात्र काळी संपली, आली उषा
हासली आशा प्रीतीची पांघरुनी झूल रे
पापण्यांना स्तब्ध राहू दे तुझिया चिंतनी
का पडावी सांग राया मन्मनाला भूल रे
गीत | - | अनिल भारती |
संगीत | - | मधुकर पाठक |
स्वर | - | सुलोचना चव्हाण |
गीत प्रकार | - | भावगीत |
वंचना | - | फसवणूक. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.