लाकडाच्या वखारीत
लाकडाच्या वखारीत माकडाचा दवाखाना
खरं म्हणा, खोटं म्हणा, तिथं येती रोगी नाना
माकडाचा थाट, डोक्यावर हॅट
पायात विजार, तोंडात सिगार !
एक आली काळी बाई, तिचं नाव कोकिळाताई
तिचा बिघडला गळा, बारीक बारीक येती कळा
माकड म्हणालं, "धीर धरा, जरा थोडा 'आ' करा."
कोकिळेनं केलं 'आ', माकड म्हणालं, "वा !"
एक काजवा चिमटीत घेऊन
माकडानं चोच घेतली पाहून
"काय?", म्हणाली कोकिळा
माकड म्हणालं, "गंडमाळा.
टॉनसिल्स बाई ! टॉनसिल्स !
चार महिने गाऊ नका,
उन्हातान्हात जाऊ नका.
अंब्याचा मोहोर खाऊ नका,
थोडा तरी विसावा घ्या आणि बारा कैर्या आणून द्या"
भंभेरी भंभेरी भम् !
बोक्याला झाला खोकला आणि तो चुलीपुढं ओकला
मनुताई भ्याल्या, दवाखान्यात आल्या.
माकड म्हणालं, "या ताई, बसा अशा शेजारी.
बोकोबा की पिल्लू टिल्लू, कोण आहे आजारी?"
मनू म्हणाली, "वैद्यबुवा, यांच्यासाठी दवा हवा !"
"काय झालं बोकोबाला?" मनु म्हणाली, "खोकला"
माकड म्हणालं ताईंना,
"सांगा तुमच्या यजमानांना, दूध दही पिऊ नका.
उंदीरबिंदीर खाऊ नका, अडगळीत जाऊ नका.
गोळ्या देतो, बडगा छाप,
तासातासांनी दोन घ्या."
भंभेरी भंभेरी भम् !
मग आला वखारवाला
त्या रोग्याला डॉक्टर भ्याला !
रोग्याने घेतली काठी, हाणली त्याच्या पाठी,
रोगी मारता राहीना, माकडाला उठता येईना

गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | सुधीर फडके |
चित्रपट | - | चिमण्यांची शाळा |
गीत प्रकार | - | बालगीत, चित्रगीत |
अडगळ | - | निरुपयोगी, अडचण करणार्या वस्तू. |
इजार (विजार) | - | Trousers / Pants. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.