लाज राख नंदलाला
तव भगिनीचा धावा ऐकुनी, धाव घेई गोपाळा
लाज राख नंदलाला
द्युतामध्ये पांडव हरले
उपहसाने कौरव हसले
लाज सोडुनी सभेत धरिले माझ्या पदराला
अबलेसम हे पांडव सगळे
खाली माना घालुनी बसले
आणि रक्षाया शील सतीचे कुणी नाही उरला
आसू माझिया नयनी थिजले
घाबरले मी डोळे मिटले
रूप पहाया तुझे सावळे प्राण आता उरला
लाज राख नंदलाला
द्युतामध्ये पांडव हरले
उपहसाने कौरव हसले
लाज सोडुनी सभेत धरिले माझ्या पदराला
अबलेसम हे पांडव सगळे
खाली माना घालुनी बसले
आणि रक्षाया शील सतीचे कुणी नाही उरला
आसू माझिया नयनी थिजले
घाबरले मी डोळे मिटले
रूप पहाया तुझे सावळे प्राण आता उरला
गीत | - | योगेश्वर अभ्यंकर |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | माणिक वर्मा |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भक्तीगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.