A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कुंजवनाची सुंदर राणी

कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी
चांदणं राती अशा एकान्‍ती मनसागर उसळं मीलनाची ऊर्मी

लखलख चंदेरी आभाळ होते, माझ्या मनीही प्रीत जागते
प्रियतम भेटाया तुज आले मी कळलं का?

कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी
चांदणं राती अशा एकान्‍ती मनसागर उसळं मीलनाची ऊर्मी

मेघसावळा माझा राया, भोळा भाबडा माझा राया
माझ्यावरी त्याची आभाळाएवढी माया, माझा राया ग
मर्दानी छातीचा माझा राया, मोठ्या मनाचा माझा राया
माझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया, माझा राया ग

माझं काळीज तू, माझी हरणी, तुझं रूप हे नक्षत्रावानी
ह्या संसाराला देवाजीची छाया ग

मेघसावळा माझा राया भोळा भाबडा माझा राया
माझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया, माझा राया ग

मन माझे उमलून गेले, स्पर्श तुझा झाला
प्रीतीचा बहर बघ आला, हा वेड लावुनी गेला

होतो मी एक अनामिक व्यर्थ भटकलेला
तू आलीस अन्‌ जगण्याला अर्थ नवा आला
प्रीतीचा बहर बघ आला, हा वेड लावुनी गेला

मक्याच्या शेतात एकलीच होते, ठाऊक नव्हतं कुणा
अरे उभ्या पिकामंदी अडवा घुसतोय हाय कोन ह्यो पाहुणा

मी दाबून बघतुया कणसं भरला हाय का दाणा

तुझ्या प्रीतीत झाले खुळी, तुझ्यावाचून न करमे मुळी
माझ्या श्वासांत तू, माझ्या स्वप्‍नात तू, तरी का रे सख्या दूर तू
सजणा याद ही याद ही छळते तुझी याद रे

तुझ्या प्रीतीत झालो खुळा, छंद नाही मला वेगळा
माझ्या श्वासांत तू, माझ्या स्वप्‍नात तू, तरी का ग सखे दूर तू
सजणी याद ही याद ही छळते तुझी याद ग
अंतर्यामी - अंत:करण / मन.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  अजय गोगावले, बेला सुलाखे, योगिता गोडबोले-पाठक, अमेय दाते, विजय प्रकाश