A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कुणी म्हणेल वेडा तुला

कुणी म्हणेल वेडा तुला
कुणी म्हणेल वेडी मला
या वेडाची गोडी ठाऊक
तुझी तुला अन्‌ माझी मला !

हे वेड जगावेगळे
ते जगास कुठुनी कळे?
जगावेगळा छंद लागला
तुझा मला अन्‌ माझा तुला !

मज येईना बोलता
तुज साधेना सांगता
मुक्यासारखे बघती डोळे
तुझे मला अन्‌ माझे तुला !

हे दोन जिवांचे कोडे
ते ज्याच्या त्या उलगडे
ह्या कोड्याची फोड माहिती
तुझी तुला अन्‌ माझी मला !