A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कुणी ग बाई मारली

अजून जाईना कळ दंडाची, चढवू कशी मी चोळी
कुणी ग बाई मारली कोपरखळी?

दिस जत्रंचा होता पहिला, साजासंगं मी शिणगार केला
मी बाई भित्री, हरिणी बावरी, नाजूक चंद्रावळी
कुणी ग बाई मारली कोपरखळी?

हौशी-गवशी-नवशी पोरं, फिरू लागली मागं म्होरं
कोण कसा ग डिवचून गेला राधेला वनमाळी
कुणी ग बाई मारली कोपरखळी?

कळ गेली ग काळीज चिरुनी, काटा आला अंगावरुनी
दवापाणी मी करू, कशाची उगळून लावू मुळी?
कुणी ग बाई मारली कोपरखळी?