कुंभारासारखा गुरू नाही रे
कुंभारासारखा गुरू नाही रे जगात
वर घालितो धपाटा, आत आधाराचा हात
आधी तुडवी तुडवी, मग हाते कुरवाळी
ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी
घडे थोराघरी जाती, घडे जाती राऊळात
कुणी चढून बसतो गावगौरीच्या मस्तकी
कुणी मद्यपात्र होतो रावराजाच्या हस्तकी
अव्यातली आग नाही कुणा पुन्हा आठवत
कुणी पूजेचा कलश, कुणी गोरसाचा माठ
देता आकार गुरूने, ज्याची त्याला लाभे वाट
घट पावती प्रतिष्ठा, गुरू राहतो अज्ञात
वर घालितो धपाटा, आत आधाराचा हात
आधी तुडवी तुडवी, मग हाते कुरवाळी
ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी
घडे थोराघरी जाती, घडे जाती राऊळात
कुणी चढून बसतो गावगौरीच्या मस्तकी
कुणी मद्यपात्र होतो रावराजाच्या हस्तकी
अव्यातली आग नाही कुणा पुन्हा आठवत
कुणी पूजेचा कलश, कुणी गोरसाचा माठ
देता आकार गुरूने, ज्याची त्याला लाभे वाट
घट पावती प्रतिष्ठा, गुरू राहतो अज्ञात
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | अनुराधा मराठे |
गीत प्रकार | - | भावगीत |
अवा | - | कुंभाराची भट्टी. |
गोरस | - | दूध. |
राऊळ | - | देऊळ. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.