A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कुलवधू

माझी डोली चालली ग दूरदेशी नव्या गावा
तिथे सोबतीला येई माझ्या स्वप्‍नांचा रावा

तिथल्या चौकटीत शोधीन माझे नवेसे आभाळ
तिथले ऊन-पाऊस भरतील माझी ओंजळ

स्वप्‍न राही मागे आता व्यथा सतत उरात
नव्या उंबर्‍याची आस जागे तरीही मनात

एक नदी सारखी वाहते मी जणू
पाऊलखुणा ठेवून मागे चालले मी कुलवधू
गीत - अश्विनी शेंडे
संगीत - निलेश मोहरीर
स्वर- वैशाली भैसने-माडे
गीत प्रकार - मालिका गीत
  
टीप -
• शीर्षक गीत, मालिका- कुलवधू, वाहिनी- झी मराठी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.