A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कुहु कुहु मन बोले

कुहु कुहु मन बोले खरेखुरे क्षण हे
निळेनिळे घन ओले कुठे कसे वळले

उधाण लाटा कुठे निघाल्या सोडुनी किनारे
नशीब माझे फिरून वेडे तुझ्यापाशी आले

नवीन हा रस्ता मला हवी तुझी साथ
जगू दे आजचे कशाला उद्याची बात?

जिथे जिथे नेशील तू, तिथे तिथे येईन मी
ऊन कालचे पुसुनी पाऊसगाणे गाईन मी
जुळल्या रेषा नशिबाच्या येता हाती हात
जगू दे आजचे कशाला उद्याची बात?

नको जाऊ तू दूर मनी उठे काहूर
सावली ही स्पर्शाची सोबतीस हे सूर
इतके सुंदर स्वप्‍न हवेसे, हवी हीच रात
जगू दे आजचे कशाला उद्याची बात?
गीत - अश्विनी शेंडे
संगीत - निलेश मोहरीर
स्वर- माधुरी करमरकर, जयदीप बगवाडकर
गीत प्रकार - युगुलगीत, मालिका गीत, मना तुझे मनोगत
  
टीप -
• शीर्षक गीत, मालिका- कशाला उद्याची बात, वाहिनी- स्टार प्रवाह.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  माधुरी करमरकर, जयदीप बगवाडकर