कुबेराचं धन माझ्या शेतात
देवावाणी शेत माझं नवसाला पावलं
कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं
झाकली मूठ ही मिरगानं फेकली
निढळाची धार ती सर्गानी शिंपली
बाळरूप कोवळं शिवारात हासलं
धरतीच्या माउलीनं दिनरात पोसलं
तरारुन आला भरा, गहू हरभरा
शाळूराजा डुलतोय झुलवीत तुरा
तरुणपण जवारीनं पानाआड झाकलं
चोच मारून पाखरू पिकामधी लपलं
कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं
मोटेवरी रंगली ढंगदार लावणी
घुमवीत गोफणी सुरू झाली राखणी
लक्ष्मी ही देखणी रूप तिनं दावलं
दिवसाच्या डोळियांत नाही बघा मावलं
कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं
कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं
झाकली मूठ ही मिरगानं फेकली
निढळाची धार ती सर्गानी शिंपली
बाळरूप कोवळं शिवारात हासलं
धरतीच्या माउलीनं दिनरात पोसलं
तरारुन आला भरा, गहू हरभरा
शाळूराजा डुलतोय झुलवीत तुरा
तरुणपण जवारीनं पानाआड झाकलं
चोच मारून पाखरू पिकामधी लपलं
कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं
मोटेवरी रंगली ढंगदार लावणी
घुमवीत गोफणी सुरू झाली राखणी
लक्ष्मी ही देखणी रूप तिनं दावलं
दिवसाच्या डोळियांत नाही बघा मावलं
कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | उषा मंगेशकर, पं. हृदयनाथ मंगेशकर |
चित्रपट | - | शिकलेली बायको |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
गोफण | - | शेतातील धान्यावरील पक्षी उडवण्यासाठी दगड मारताना वापरावयाचे उपकरण. |
निढळ | - | कपाळ. |
मोट | - | विहिरीतून पाणी काढण्याचे मोठे पात्र. |
शाळू | - | जोंधळ्याची एक जात. हा हिवाळ्याच्या दिवसांत पिकतो. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.