कोणते नाते म्हणू हे
वेगळ्या वाटा निराळे आपले आभाळही
का तुझ्यामाझ्यात विणतो बंध हळवे काळही
कोण जाणे काय आहे या क्षणाचे मागणे?
कोणते नाते म्हणू हे? गुंतणे ना टाळणे
का तरी माझेतुझे हे सोबतीने चालणे
हा तुझा आहे लळा की सोबतीची आस ही
काय देऊ नेमके या भावनेला नाव मी
या मनाचे त्या मनाशी उगा हे रेंगाळणे
कोणते नाते म्हणू हे? गुंतणे ना टाळणे
का तरी माझेतुझे हे सोबतीने चालणे
का तुझ्यामाझ्यात विणतो बंध हळवे काळही
कोण जाणे काय आहे या क्षणाचे मागणे?
कोणते नाते म्हणू हे? गुंतणे ना टाळणे
का तरी माझेतुझे हे सोबतीने चालणे
हा तुझा आहे लळा की सोबतीची आस ही
काय देऊ नेमके या भावनेला नाव मी
या मनाचे त्या मनाशी उगा हे रेंगाळणे
कोणते नाते म्हणू हे? गुंतणे ना टाळणे
का तरी माझेतुझे हे सोबतीने चालणे
गीत | - | गुरु ठाकूर |
संगीत | - | मंगेश धाकडे |
स्वर | - | वैशाली भैसने-माडे |
चित्रपट | - | आम्ही दोघी |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.