A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
किति सांगुं तुला मज

किति सांगुं तुला मज चैन नसे ॥

हें दु:ख तरी मी साहुं कसें ।
या समयिं मला नच कोणि पुसे ।
हा विरह सखे मज भाजितसे ।
मन कसें आवरूं ।
किति धीर धरूं । कसें करूं ॥

हे बंधु नव्हत मम वैरि खरे ।
दावीती कसें वरि प्रेम बरें ।
बोलोनी पाडीती हृदयासी घरे ।
नको नको मला जिव ।
विष तरि पाजिव ।
सखे सोडिव ॥
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वराविष्कार- हिराबाई बडोदेकर
आशा खाडिलकर
कीर्ती शिलेदार
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - सौभद्र
राग - आनंद भैरवी
ताल-धुमाळी
गीत प्रकार - नाट्यसंगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  हिराबाई बडोदेकर
  आशा खाडिलकर
  कीर्ती शिलेदार