किती दिसांनी आज भेटसी
किती दिसांनी आज भेटसी, पुसशी कुशल मला
तुझ्याचसाठी झुरते मनी मी, कैसे सांगू रे तुला
प्रीतीची वचने राजा, विसरू कशी?
दिवस सहज निघुनी जातो
रात्री तुझा आठव येतो
अश्रुंनी माझी भिजुनी जाई उशी
मानभावी पुरुषी वाणी
फुलपाखरांची गाणी
स्त्रीजाती वेडी भुलुनी पडते फशी
एकवार मधुकर येतो
चैत्रमास चाखुन जातो
स्वप्नाळू राही फुलवेली वेडीपिशी
तुझ्याचसाठी झुरते मनी मी, कैसे सांगू रे तुला
प्रीतीची वचने राजा, विसरू कशी?
दिवस सहज निघुनी जातो
रात्री तुझा आठव येतो
अश्रुंनी माझी भिजुनी जाई उशी
मानभावी पुरुषी वाणी
फुलपाखरांची गाणी
स्त्रीजाती वेडी भुलुनी पडते फशी
एकवार मधुकर येतो
चैत्रमास चाखुन जातो
स्वप्नाळू राही फुलवेली वेडीपिशी
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | प्रभाकर जोग |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | जावई माझा भला |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी |
मधुकर | - | भ्रमर, भुंगा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.