A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
खुलता कळी ही खुलेना

मी पहावे तू दिसावे
पारणे या मनाचे फिटेना
अंतरीची अंतरे ही
का तरीही सारी मिटेना?

हीच प्रीती, हीच भीती
वीण दोघांतली ही तुटेना
हेच कोडे रोज थोडे
सोडवावे तरीही सुटेना

आस मुकल्या जीवनाची
आज खुलता कळी ही खुलेना !
वाट चुकल्या या मनाची
आज खुलता कळी ही खुलेना !
गीत - समीर सप्‍तीस्कर
संगीत - समीर सप्‍तीस्कर
स्वर- श्रेया घोषाल
गीत प्रकार - मालिका गीत
  
टीप -
• शीर्षक गीत, मालिका- खुलता कळी ही खुलेना, वाहिनी- झी मराठी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.