खिन्न या वाटा
खिन्न या वाटा दूर पळणार्या
या स्मृती सार्या जीव छळणार्या
लाडक्या शपथा, लाजरी वचने
पाकळ्या त्यांच्या आज गळणार्या
रात्र वैरिण ही सात जन्मांची
आणि या उल्का तोल ढळणार्या
चांदण्याकाठी धुंद त्या भेटी
या व्यथा उरल्या आज जळणार्या
या स्मृती सार्या जीव छळणार्या
लाडक्या शपथा, लाजरी वचने
पाकळ्या त्यांच्या आज गळणार्या
रात्र वैरिण ही सात जन्मांची
आणि या उल्का तोल ढळणार्या
चांदण्याकाठी धुंद त्या भेटी
या व्यथा उरल्या आज जळणार्या
गीत | - | मंगेश पाडगांवकर |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | उषा मंगेशकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
उल्का | - | आकाशातून पडलेला तारा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.