खेड्यामधले घर कौलारू (१)
आठवणींच्या आधी जाते
तिथे मनाचे निळे पाखरू
खेड्यामधले घर कौलारू !
हिरवी श्यामल भवती शेती
पाऊलवाटा अंगणी मिळती
लव फुलवंती, जुई शेवंती
शेंदरी अंबा सजे मोहरू !
चौकट तीवर बाल गणपती
चौसोपी खण स्वागत करती
झोपाळ्यावर अभंग कातर
सवे लागती कड्या करकरू !
माजघरातील उजेड मिणमिण
वृद्ध कांकणे करिती किणकिण
किणकिण ती हळू, ये कुरवाळू
दूरदेशीचे प्रौढ लेकरू !
तिथे मनाचे निळे पाखरू
खेड्यामधले घर कौलारू !
हिरवी श्यामल भवती शेती
पाऊलवाटा अंगणी मिळती
लव फुलवंती, जुई शेवंती
शेंदरी अंबा सजे मोहरू !
चौकट तीवर बाल गणपती
चौसोपी खण स्वागत करती
झोपाळ्यावर अभंग कातर
सवे लागती कड्या करकरू !
माजघरातील उजेड मिणमिण
वृद्ध कांकणे करिती किणकिण
किणकिण ती हळू, ये कुरवाळू
दूरदेशीचे प्रौढ लेकरू !
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | ऊन पाऊस |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
कातर | - | कापरा / आर्त. |
खण | - | इमारतीच्या दोन खांबातली जागा. |
चौसोपी | - | चार सोपे (सोपा - ओवरी, ओटा) असलेले. |
लव | - | सूक्ष्म. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.