खरा तो एकची धर्म
खरा तो एकची धर्म । जगाला प्रेम अर्पावे ॥
जगी जे हीन अति पतित
जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे । जगाला प्रेम अर्पावे ॥
जयांना कोणि ना जगती
सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे । जगाला प्रेम अर्पावे ॥
समस्ता धीर तो द्यावा
सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे । जगाला प्रेम अर्पावे ॥
सदा जे आर्त अति विकळ
जयांना गांजिती सकळ
तया जाऊन हसवावे । जगाला प्रेम अर्पावे ॥
कुणा ना व्यर्थ शिणवावे
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्ता बंधु मानावे । जगाला प्रेम अर्पावे ॥
प्रभुची लेकरे सारी
तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे । जगाला प्रेम अर्पावे ॥
जिथे अंधार औदास्य
जिथे नैराश्य आलस्य
प्रकाशा तेथ नव न्यावे । जगाला प्रेम अर्पावे ॥
असे जे आपणापाशी
असे जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे । जगाला प्रेम अर्पावे ॥
भरावा मोद विश्वात
असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे । जगाला प्रेम अर्पावे ॥
असे हे सार धर्माचे
असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे । जगाला प्रेम अर्पावे ॥
जयाला धर्म तो प्यारा
जयाला देव तो प्यारा
तयाने प्रेममय व्हावे । जगाला प्रेम अर्पावे ॥

गीत | - | साने गुरुजी |
संगीत | - | |
स्वर | - | |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत, प्रार्थना |
टीप - • काव्य रचना - मे १९३४, धुळे तुरुंग. • या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल. |
मोद | - | आनंद |
विकल | - | विव्हल. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.