A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
खाई दैवाचे तडाखे

छिन्‍नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव
खाई दैवाचे तडाखे, त्याचं माणूस हे नाव

चिमुकल्या लेकराचा छळ पंडिताने केला
आळंदीच्या बालकाले, बालपणा नको झाला
पुढं वाढलं वाढलं ज्ञानराजाचं वैभव

मानखंडना संताप, सारा गाव उलटला
वह्या तरता पाण्यात पुन्हा गुरू पालटला
तुका देवाइतुका वाटे, एक महान वैष्णव

आळ चोरीचा घेतला, चोप दिला बडव्यानं
विठ्ठलाचा हार चोख्या, सांग लपवला कोन
त्याच चोखोबाच्या घरी जेवे वैकुंठीचा देव !