A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
केतकीच्या बनी तिथे

केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर
गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर

पापणीत साचले अंतरांत रंगले
प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले
ओठांवरी भिजला ग आसावला सूर

भावफूल रात्रीच्या अंतरंगी डोलले
धुक्यांतुनी कुणी आज भावगीत बोलले
डोळियांत पाहिले कौमुदीत नाचले
स्वप्‍नरंग स्वप्‍निच्या सुरासुरांत थांबले
झाडावरी दिसला ग भारला चकोर