केली मी चाफ्याची रे
घे प्याला हा भरला मिसळुन लाजेची लाली
सरली लज्जा, नीती भीती त्यांतच विरघळली
केली मी चाफ्याची रे शय्या !
ना झोप, जांभई आली
हो रात दंवाने ओली
दरवळे धुंद मोतिया !
पुन्हा पुन्हा झुकुनी सुरई
प्याल्याचे चुंबन घेई
लागली रात झिंगाया !
आपुले गुपित हुडकीत
पोचला चांद खिडकीत
ओढिते सरपडदा सैय्या !
सरली लज्जा, नीती भीती त्यांतच विरघळली
केली मी चाफ्याची रे शय्या !
ना झोप, जांभई आली
हो रात दंवाने ओली
दरवळे धुंद मोतिया !
पुन्हा पुन्हा झुकुनी सुरई
प्याल्याचे चुंबन घेई
लागली रात झिंगाया !
आपुले गुपित हुडकीत
पोचला चांद खिडकीत
ओढिते सरपडदा सैय्या !
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | महाराणी येसूबाई |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.