A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कवणें तुज गंजियलें

कवणें तुज गंजियलें सांग सुंदरी ।
त्यजुनि शेज लोळसि कां ऐसि भूवरिं ॥

प्रिय नाहीं तुजविण मज अन्य कामिनी ।
इच्छिशि तरी दास्य करिल इंदूकामिनी ॥

रंकातें राव करीन । रावातें करीन दीन ।
वध्यातें प्राणदान । निर्वध्या खचित वधिन ।
रामाची शपथ सर्व सत्य मी करीन ॥