A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कशी रे तुला भेटू

कशी रे तुला भेटू, मला वाटे लाज
लौकिक तुझा मोठा आणिक घरंदाज

करिती कुटाळकी तुझे ते टाळकरी
साथीला देई साथ घरची एकतारी
भोवती निंदकांचे वाजती पखवाज

ओळखते राया माझी मी पायरी
बोलतील तुझी सोयरीधायरी
जहरी बोलांचे हे जुळले तिरंदाज

होईल तेलवात स्‍नेहात आपोआप
जळेल जन्मोजन्मी प्रीतीचा नंदादीप
वयात यौवनाचा विखुरला साज