A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
करो सब निछावर

करो सब निछावर बनो सब फ़क़ीर
वित्त-प्राणांची आता का फिकिर

आपुल्या आईचे सत्त्व लागे पणा
रत्‍न-मोती-हिरे लोभ यांचा कुणा
तुम्ही मायभूचे हिरे-रत्‍न-वीर

पाश पायातले तोडण्या सिद्ध व्हा
खड्ग हातातले दुश्मना दाखवा
'चलो दिल्ली' गर्जा, आता का उशीर