कन्या सासुर्यासीं जाये
कन्या सासुर्यासीं जाये ।
मागें परतोनी पाहे ॥१॥
तैसें जालें माझ्या जिवा
केव्हां भेटसी केशवा ॥२॥
चुकलिया माये ।
बाळ हुरुहुरु पाहे ॥३॥
जीवनावेगळी मासोळी ।
तैसा तुका तळमळी
मागें परतोनी पाहे ॥१॥
तैसें जालें माझ्या जिवा
केव्हां भेटसी केशवा ॥२॥
चुकलिया माये ।
बाळ हुरुहुरु पाहे ॥३॥
जीवनावेगळी मासोळी ।
तैसा तुका तळमळी
गीत | - | संत तुकाराम |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | लता मंगेशकर |
गीत प्रकार | - | संतवाणी |
जीवन | - | पाणी. |
भावार्थ-
- मुलगी सासरी जायला निघाली असता, तिला माहेर व माहेरची माणसे सोडताना दु:ख होते. ती परत परत मागे वळून आपल्या घराला व नातेवाईकांना पाहते. (कारण पूर्वी लहान वयात मुलांची लग्ने होत असत.)
- हे देवा, त्याचप्रमाणे माझ्या जिवाला झाले आहे. तू मला केव्हा भेटशील?
- आई दिसेनाशी झाली की लहान मूल गांगरते, इकडे तिकडे पाहत आईला शोधते.
- तुकाराम महाराज म्हणतात, पाण्याबाहेर काढलेली मासळी जशी तडफड करते तशी माझी स्थिती झाली आहे. मी तळमळतो आहे.
गो. वि. नामजोशी
संत तुकारामाची सार्थ अभंगवाणी
सौजन्य- सुलभ प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या ले.खात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
इतर भावार्थ
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.