आह्मांसि कां दिली वांगली रे ॥१॥
स्व-गत सच्चिदानंदे मिळोनी शुद्ध सत्त्व-गुणें विणली रे ।
षड्-गुण गोंडे रत्न-जडित तुज श्याम-सुंदरा शोभली रे ॥२॥
षड्-विकार षड्-वैरी मिळोनि ताप-त्रयें जी विणली रे ।
नवा ठाईं फाटुनि गेली त्वां आह्मांसि दिधली रे ॥३॥
ऋषि मुनि ध्यातां मुखीं नाम गातां संदेह-वृत्ति विरली रे ।
बाप रखुमादेवी वरे विठ्ठले त्वत्-पदीं वृत्ति मुरली रे ॥४॥
गीत | - | संत ज्ञानेश्वर |
संगीत | - | पं. भीमसेन जोशी |
स्वर | - | पं. भीमसेन जोशी |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, संतवाणी |
वांगली | - | वाईट. |
ईश्वर सच्चिदानंद-स्वरूप; आम्ही ताप-त्रय-मग्न. ईश्वर शुद्ध सत्त्वगुणी; आम्ही त्रिगुणांची मिसळ. ईश्वर सर्व-गुण मंडित; आम्ही सर्व-दोष-संपन्न. ईश्वर अखंड; आम्ही फाटके. हा असा भेद का? हा संदेह काही केल्या चित्तातून जाईना. एकदा एक योगी ध्यान करताना पाहिला, एकदा एक भक्त नाम गाताना पाहिला अणि माझा संदेह सहजच जिरून गेला. लक्षात आले की साधनेचे आणि भक्तीचे सुख अनुभविण्यासाठी हा भेद आहे. तेव्हापासून त्याच्या चरणीं माझी वृत्ति लीन झाली.
आचार्य विनोबा भावे
ज्ञानेश्वरांची भजनें
सौजन्य- परंधाम प्रकाशन, वर्धा.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.