कानात सांग माझ्या
कानात सांग माझ्या, मी आवडे तुला का?
माझी अबोल प्रीती नयना तुझ्या कळे का?
नयनांत माझिया हे मंदिर यौवनाचे
मी न्याहळून बघते मूर्तित रूप तव ते
फूलमाळ गुंफलेली कंठी तुझ्या पडे का?
मी ज्योत प्रीतीची ही जळते तुझ्याचसाठी
होऊन तू पतंग घे झेप भेटीसाठी
सद्भाग्य हे सुखाचे नशिबी तरी असे का?
मी बासरीपरी त्या ओठी तुझ्या रहावे
सूरांसवे सुगंधी धुंदीत गात जावे
हे स्वप्न अंतरीचे होईल पूर्ण कधी का?
माझी अबोल प्रीती नयना तुझ्या कळे का?
नयनांत माझिया हे मंदिर यौवनाचे
मी न्याहळून बघते मूर्तित रूप तव ते
फूलमाळ गुंफलेली कंठी तुझ्या पडे का?
मी ज्योत प्रीतीची ही जळते तुझ्याचसाठी
होऊन तू पतंग घे झेप भेटीसाठी
सद्भाग्य हे सुखाचे नशिबी तरी असे का?
मी बासरीपरी त्या ओठी तुझ्या रहावे
सूरांसवे सुगंधी धुंदीत गात जावे
हे स्वप्न अंतरीचे होईल पूर्ण कधी का?
गीत | - | मधुकर जोशी |
संगीत | - | अनिल मोहिले |
स्वर | - | शैला मोहिले |
गीत प्रकार | - | भावगीत |
पतंग | - | दिव्यावर झडप घालणारा पाखरू. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.