A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कल्पनेचा कुंचला स्वप्‍नरंगी

कल्पनेचा कुंचला, स्वप्‍नरंगी रंगला
चित्र मी काढू कसे? सजणा सांग ना !

हे निळेपण पांघरावे
गीत माझे मोहरावे
शब्द मी माळू कसे?
सजणा सांग ना, सांग ना !

खेळतो हा धुंद वारा
या धुक्याच्या शुभ्र धारा
रंग मी खेळू कसे?
सजणा सांग ना, सांग ना !

आज संध्या रूप घेई, प्रीतीचे
प्रीतीचे मज दान देई
गुज मी बोलू कसे?
सजणा सांग ना, सांग ना !