A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कळत नकळत

मन होई फुलांचे थवे, गंध हे नवे कुठुनसे येती
मन पाऊल पाऊल स्वप्‍ने ओली हुळहुळणारी माती
मन वार्‍यावरती झुलते, असे उंच उंच का उडते?
मग कोणा पाहून भुलते?
सारे कळत नकळतच घडते !

कुणीतरी मग माझे होईल हात घेउनी हाती
मिठीत घेऊन मोजू चांदण्या काळोखाच्या राती
उधळून द्यावे संचित सारे आजवरी जे जपले
साथ राहू दे जन्मोजन्मी असेच नाते अपुले

पण कसे कळावे कुणी सांगावे आज-उद्या जे घडते
जरी हवे वाटते नवे विश्व ते पाऊल का अडखळते?
वाहत वाहत जाताना मन क्षितिजापाशी अडते
परि पुन्हा पुन्हा मोहरते
सारे कळत नकळतच घडते !
गीत - अश्विनी शेंडे
संगीत - निलेश मोहरीर
स्वर- वैशाली सामंत
गीत प्रकार - मालिका गीत
  
टीप -
• शीर्षक गीत, मालिका- कळत नकळत, वाहिनी- झी मराठी.
संचित - पूर्वजन्मीचे पापपुण्य.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.