कळले नाही कधी उसवले
कळले नाही कधी उसवले
लक्तर जगण्याचे
गेले फाटून उडण्याआधी
पतंग स्वप्नांचे
नशिबी आली फरपट माझ्या
कारण चुकली वाट
नकोस गिरवू तीच उजळणी
तू ही पुन्हा दिनरात
चुकली सारी गणिते
केवळ शून्य उरे हाती
उडुनी गेली वर्षे
झाली जन्माची माती
पसार झाली नाती सगळी
सोडून अंधारात
नकोस गिरवू तीच उजळणी
तू ही पुन्हा दिनरात
जाती भावना जळुनी
जेव्हा व्यवहारी जग छळते
गुंता होतो ह्या जगण्याचा
अन् नियती भेसूर हसते
चुकले कोठे कळण्याआधी
होते वाताहात
नकोस गिरवू तीच उजळणी
तू ही पुन्हा दिनरात
लक्तर जगण्याचे
गेले फाटून उडण्याआधी
पतंग स्वप्नांचे
नशिबी आली फरपट माझ्या
कारण चुकली वाट
नकोस गिरवू तीच उजळणी
तू ही पुन्हा दिनरात
चुकली सारी गणिते
केवळ शून्य उरे हाती
उडुनी गेली वर्षे
झाली जन्माची माती
पसार झाली नाती सगळी
सोडून अंधारात
नकोस गिरवू तीच उजळणी
तू ही पुन्हा दिनरात
जाती भावना जळुनी
जेव्हा व्यवहारी जग छळते
गुंता होतो ह्या जगण्याचा
अन् नियती भेसूर हसते
चुकले कोठे कळण्याआधी
होते वाताहात
नकोस गिरवू तीच उजळणी
तू ही पुन्हा दिनरात
गीत | - | गुरु ठाकूर |
संगीत | - | अजित-अतुल-समीर |
स्वर | - | अजित परब |
चित्रपट | - | शिक्षणाच्या आयचा घो ! |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.