A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
काका काका मला वाचवा

काका काका मला वाचवा, आले गारदी त्यांस थाबवा

मिठी मारतो कमरेला मी, पाया पडतो पुन्हां पुन्हां
काय असे पण केले हो मी? चूक जाहलीं काय दाखवा

माधवदादा अखेरीसला तुमच्यापाशीं काय बोलला
नारायण ओटीत टाकला तुम्हीच त्याचे आईबाप व्हा

बोलत नाही का हो काका, शब्द कालचे विसरलात कां?
काकी तूही गप्प उभी कां, पोरावर कां राग धरावा?

लोभ कशाचा इथला नाही, राज्य नको मज नकोच कांही
तुम्हास घ्या हो पेशवाई ही, खड्गाचा पण वार आडवा