काय बाइ स्वारींची ती
काय बाइ स्वारींची ती ऐट बोलण्याची
तर्हा गोड ओठामधुनी हळुंच हांसण्याची
वळुनी पाहतांना इकडे
करिति काळजाचे तुकडे
चिडविण्यांत मजला होई जोड विनोदाची
आणि कनी भलत्या वेळीं
मित्रमंडळींच्या मेळीं
फेकिती तिथुनी गालीं मूठ गुलालाची
मंदमलय अनिलावरती
हृदयकुसुम डुलते प्रीती
कळी कळी खुलते माझ्या पारिजातकाची
लावल्या किती फुलवाती
प्रणयरम्य शेजेवरती
मिटुनि नेत्र शेजारति ही प्राणवल्लभाची
तर्हा गोड ओठामधुनी हळुंच हांसण्याची
वळुनी पाहतांना इकडे
करिति काळजाचे तुकडे
चिडविण्यांत मजला होई जोड विनोदाची
आणि कनी भलत्या वेळीं
मित्रमंडळींच्या मेळीं
फेकिती तिथुनी गालीं मूठ गुलालाची
मंदमलय अनिलावरती
हृदयकुसुम डुलते प्रीती
कळी कळी खुलते माझ्या पारिजातकाची
लावल्या किती फुलवाती
प्रणयरम्य शेजेवरती
मिटुनि नेत्र शेजारति ही प्राणवल्लभाची
गीत | - | राजा बढे |
संगीत | - | पु. ल. देशपांडे |
स्वर | - | माणिक वर्मा |
गीत प्रकार | - | भावगीत |
अनिल | - | वायु, वारा. |
कनी | - | किनई या अर्थाने. |
मलयानिल | - | मलय पर्वतावरून येणारा वारा. |
वल्लभ | - | पती / प्रिय. |
शेज | - | अंथरूण. |
शेजारती | - | रात्री देवाला निजवण्यापूर्वी आरती करतात ती. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.