काय बाई सांगू
काय बाई सांगू? कसं ग सांगू?
मलाच माझी वाटे लाज
काहीतरी होऊन गेलंय आज !
उगीच फुलुनी आलं फूल
उगीच जिवाला पडली भूल
त्या रंगाचा त्या गंधाचा
अंगावर मी ल्याले साज
काहीतरी होऊन गेलंय आज !
जरी लाजरी झाले धीट
बघत राहिले त्याला नीट
कुळवंताची पोर कशी मी
विसरून गेले रीतरिवाज?
काहीतरी होऊन गेलंय आज !
सहज बोलले हसले मी
मलाच हरवुन बसले मी
एक अनावर जडली बाधा
नाही चालला काही इलाज
काहीतरी होऊन गेलंय आज !
मलाच माझी वाटे लाज
काहीतरी होऊन गेलंय आज !
उगीच फुलुनी आलं फूल
उगीच जिवाला पडली भूल
त्या रंगाचा त्या गंधाचा
अंगावर मी ल्याले साज
काहीतरी होऊन गेलंय आज !
जरी लाजरी झाले धीट
बघत राहिले त्याला नीट
कुळवंताची पोर कशी मी
विसरून गेले रीतरिवाज?
काहीतरी होऊन गेलंय आज !
सहज बोलले हसले मी
मलाच हरवुन बसले मी
एक अनावर जडली बाधा
नाही चालला काही इलाज
काहीतरी होऊन गेलंय आज !
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | उषा मंगेशकर |
चित्रपट | - | पवनाकाठचा धोंडी |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.