जुळून येती रेशीमगाठी
मुक्याने बोलले, गीत ते जाहले
स्वप्नं साकारले पहाटे पाहिले
नाव नात्याला काय नवे?
वेगळे मांडले सोहळे तुजसाठी
मिळावे तुझे तुला आस ही ओठी
कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी?
जुळून येती रेशीमगाठी !
आपुल्या रेशीमगाठी !
उन्हाचे चांदणे उंबर्यात सांडले
डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले?
खेळ हा कालचा, आज कोण जिंकले?
हरवले कवडसे, मिळून ते शोधले
एकमेकांना काय हवे?
जे हवे सगळेच आणले तुजसाठी
कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी
कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी?
जुळून येती रेशीमगाठी !
आपुल्या रेशीमगाठी !
स्वप्नं साकारले पहाटे पाहिले
नाव नात्याला काय नवे?
वेगळे मांडले सोहळे तुजसाठी
मिळावे तुझे तुला आस ही ओठी
कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी?
जुळून येती रेशीमगाठी !
आपुल्या रेशीमगाठी !
उन्हाचे चांदणे उंबर्यात सांडले
डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले?
खेळ हा कालचा, आज कोण जिंकले?
हरवले कवडसे, मिळून ते शोधले
एकमेकांना काय हवे?
जे हवे सगळेच आणले तुजसाठी
कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी
कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी?
जुळून येती रेशीमगाठी !
आपुल्या रेशीमगाठी !
गीत | - | अश्विनी शेंडे |
संगीत | - | निलेश मोहरीर |
स्वर | - | स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी-देशपांडे |
गीत प्रकार | - | मालिका गीत |
कवडसा | - | आडोश्याच्या आडून येणारी उन्हाची तिरीप. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.